मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनोदशेठ पाटील यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना नवनीत गाईडचे वाटप
प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Jul-2024 05:08 pmतळोजा : घोट गावचे प्रसिद्ध उद्योजक व भाजपचे युवा नेते विनोदशेठ पाटील यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहावीच्या विद्यार्थ्यांना नवनीत मार्गदर्शक पुस्तिका (गाईड) वाटप करून एक सामाजिक उपक्रम राबविला. घोट येथील सद्गुरू वामनबाबा महाराज माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विनोदशेठ पाटील हे परिसरातील मोठे उद्योजक असून त्यांची सामाजिक बांधिलकी नेहमीच अधोरेखित असते. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत होईला आणि त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास करत मुख्याध्यापक संदेश पाटील सर यांनी यावेळी विनोदशेठ पाटील यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव भोईर, विठ्ठल भाऊ वाव्हले, गिरीश पाटिल, एकनाथ कोळी, नितिन पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंभोरे सर यांनी केले.