कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल उरण महाविकास आघाडीचा मेळावा

प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Jun-2024 08:32 pm

पनवेल : कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२४ च्या आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेल येथे संपन्न झाला. यावेळी महाआघाडीचे उमेदवार रमेश किर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याचा निर्धारच उपस्थितांनी केला. या मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, शेकापचे काशिनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, काँग्रेसचे नंदराज मुंगाजी, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, विश्‍वास पेटकर, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, श्रृती म्हात्रे, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ.भक्तीकुमार दवे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

        या निर्धार मेळाव्याला माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, विजयासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लेाकसभेला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे व उमेदवाराला भरघोस मतदान सुद्धा झाले आहे. ही निवडणूक सुद्धा अशाच पद्धतीने एकदिलाने लढूऊ विजयासाठी लढायचे आहे, या उद्देशानेच जीवाचे रान करू या, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सांगितले की, उरणमध्ये सुद्धा पदवीधर मतदार संघाची नोंदणी शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उरणमधून आघाडीवर होता. यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. प्रामुख्याने लोकसभेला उरण मतदार संघातील अनेक भागातील मुस्लीम व ख्रिश्‍चन बांधवांनी आपल्याला भरभरुन मतदान केले होते. यावेळी सुद्धा ते निश्‍चितच मतदान करतील व आपल्या उमेदवाराला विजयी करतील, असे सांगितले. बबनदादा पाटील यांनी सांगितले की, मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून फक्त ९ दिवस मेहनत घेतली तर विजय आपला निश्‍चित असून येथे कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नसून आपण सर्व समान आहोत. या भावनेतून काम करूया व महाविकास आघाडीचा उमेदवाराला विजयी करू या, असे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सुद्धा पनवेल-उरणमधून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रमेश किर यांना आघाडी द्यायची आहे. त्यासाठी आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी आम्हा तरुणांना मार्गदर्शन करावे व योग्य नियोजन करून प्रत्येकाला कामाची वाटणी करून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

 

 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement