केंद्र सरकारकडून नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव लवकरात लवकर मिळावे यासाठी कृती समितीचे विविध ठराव

प्रभात पर्व न्यूज - Published: 12-Jun-2024 09:18 pm

पनवेल : २४ जून रोजी लोकनेते दि. बा. पाटील यांची पुण्यतिथी असून त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज हॉलमध्ये आज (बुधवार १२ जून ) संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याला मंजुरी लवकरात कशी मिळेल, यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीसऱ्यांदा विजयाची हॅट्रीक केली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना नामकरणाचा ठराव लवकरात लवकर मंजुर करण्याची विनंती पत्राद्वारे करण्याचे ठरवण्यात आले. तसेच नव्या मंत्रिमंडळामध्ये किंजरापू राममोहन नायडू हे नागरी विमान वाहतुक मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे विमानतळाला दिबांचे नाव देण्यासंदर्भात भेट घेण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदी मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. त्यांचे संसदीय कामकाज आटपून ते पुण्यात आल्यावर त्यांची नामकरणाचा विषय सर्वप्रथम संसदेत मांडणारे तत्कालीन खासदार कपिल पाटील आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्यांना नामकरणाविषयी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच आगरी समाजाचे संजय दिना पाटील आणि सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे दोन प्रतिनीधी संसदेत खासदार म्हणून गेले आहेत. त्यांचा अभिनंदनाचाही ठराव याबैठकी करण्यात आला.

       येत्या २४ जुन २०२४ रोजी प्रकल्पग्रस्तांचे झुंझारनेते लोकनेते दि. बा. पाटील यांची पुण्यातीथी आहे. यानिमित्त नवी मुंबई, उरण, पनवेल, कल्याण, डोंबिवली, जासई, ठाणे, मुंबई, वसई विरार अशा विविध विभागांमध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव ही या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समीतीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, कृती समितीचे सदस्य जे एम म्हात्रे, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सहचिटणीस राजेश गायकर, संतोष केणे, गुलाब वझे, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, केशव स्मृती पतसंस्थेचे संचालक अविनाश कोळी, विजय गायकर, माजी नगरसेवक नितीन पाटील, कृती समितीचे खजिनदार जे. डी तांडेल, सदस्य दीपक पाटील, प्रताप पाटील, सीमा घरात, वैभव वारे, स्वप्निल वारे, कमलाकर घरत, संजय घरत, प्रकाश पंडित पाटील, रघुनाथ पाटील अर्जुन बुवा चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement