तळोजा एमआयडीसीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

प्रभात पर्व न्यूज - Published: 05-Jun-2024 10:03 pm

तळोजा : एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवी मुंबई विभागीय प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ, पनवेल विभागीय प्रादेशिक अधिकारी शसंतोष थिटे, नवी मुंबईचे उपविभागीय अधिकारी विक्रांत भालेराव, तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, तसेच गुन्हे शाखेचे श्री. पुंडे व श्री. फडतरे यांनी उपस्थित होते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आवश्यक असेलेल्या उपक्रमाबाबत चर्चा झाली.

     २०२४ च्या थीमनुसार, "जमीन पुनर्संचयन करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाचे परिणाम कमी करणे" आणि "२०५० मध्ये पृथ्वीची परिस्थिती" या भावनिक स्किटसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून पीएनजीचा वापर करण्याचा उपक्रम असलेल्या पीएनजी स्टेशनचे उद्घाटनही करण्यात आले.

      मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे संचालक सोमनाथ मालगर यांच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई वेस्ट मॅनेजमेंटने पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी दाखवत कर्मचारी आणि उपस्थितांना शाश्वत विकासाला सक्रियपणे प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement