कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पनवेलमधून मंगेश रानवडे निवडणूक लढवण्यास इच्छुक
प्रभात पर्व न्यूज - Published: 14-May-2024 04:50 pmपनवेल : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे. यासाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार असून खारघर येथील शिवेसेनेचे पनवेल महानगर संघटक मंगेश रानवडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
मूळचे अलिबागचे असलेले मंगेश रानवडे गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबई परिसरातील प्रदुषणाच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. शिवसेना वैद्यकीय कक्षामार्फत रुग्णांना आर्थिक वैद्यकीय मदत देण्यात, कोरोना काळात कोविड चाचणी करण्यासह सिडको वसाहतील पाण्याच्या विषय, रस्ते, प्रॉपर्टी टॅक्स यांसारख्या विषयांवर जनतेचा आवाज प्रशासनासमोर पोहचविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. उचशिक्षित मंगेश रानवडे ( बीएससी (बायोटेक)- एमबीए (पुणे विद्यापीठ) कोकण पदवीदार आमदारकीची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सूत्रांकडून समजते. मागील निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे ८१२७ मतांनी विजयी झाले होते तर शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी संजय मोरे यांना पनवेल परिसरातून मताधिक्य मिळवण्यासाठी मंगेश रानवडे यांचेही योगदान असल्याचे समजते. दरम्यान, मंगेश रानवडे लवकरच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करणार असल्याचे समजते.