खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य एक दिवसीय बास्केटबॉल स्पर्धा संपन्न

प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Jun-2023 01:50 pm

खारघर : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विश्वज्योत हायस्कूल सेक्टर-२० या ठिकाणी बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांतद ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वज्योत हायस्कूलचे प्रिन्सिपल किशोरी अय्यंगार, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू कुमारी स्वस्तिका घोष, भाजपा खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, भाजपच्या जिल्हा सचिव सौ.गीता चौधरी, युवा मोर्चाचे सरचिटणीस ॲड. अमर उपाध्याय, खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल कोच विनय ढिल्लोड, परेश पाटील, प्रवीण जाधव यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांना खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने चांगल्या प्रकारे क्रिकेट, स्केटिंग या विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करत असल्याबाबतचे सांगितले. खारघर मधील खेळाडूंना चांगल्या प्रतीचे प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षकांची व्यवस्था असेल अथवा इतर सोयी सुविधा देण्याचं काम खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून अध्यक्ष किरण पाटील व नगरसेविका नेत्रा किरण पाटील करत असल्याचे सांगितले. सदर स्पर्धेत जवळपास ७५ ते ८० टीमने सहभाग नोंदवला होता. यात मुलींच्या टीमची संख्या जवळपास २५ ते ३० च्या दरम्यान होती. नवी मुंबईत प्रथमताच बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन एवढ्या भव्य प्रमाणात करण्यात आल्याचे बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रस्तावना करताना, लोकनेते रामशेठ ठाकूर हे आमचे आधारस्तंभ असून त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी व क्रीडा विषयक उपक्रम आयोजित करत साजरा करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 'लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. रामशेठ ठाकूर हे आपलं शिक्षण रयत शिक्षण संस्थेतून घेतल्यानंतर सदर संस्थेसाठी आपलं काही देणं लागतं, या भावनेतून अथक प्रयत्न करत असतात व हे प्रयत्न आजच्या पिढीने अंगीकारण्यासारखे आहेत. रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबईतील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावं त्यांना खेळण्याच्या अद्यावत सुविधा मिळाव्यात या हेतूने रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी उलवे येथे केलेली आहे' असे प्रतिपादन किरण पाटील यांनी यावेळी केले. 

            स्पर्धेच्या संध्याकाळच्या सत्रात आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू कुमारी स्वस्तिका घोष, खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर तुषार कोठांबे, भारतीय तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडट व ओव्हरक्राफ्ट पायलट अपूर्वा होरे, परिवहन आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक धनराज शिंदे या मान्यवरांना खारघर स्पोर्ट्स अकॅडमीने प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यामागचा उद्देश म्हणजे या स्पर्धेतील सहभागी झालेले सर्व खेळाडू व इतरांनी या मान्यवर व्यक्तींकडून प्रेरणा घेत एक आदर्श निर्माण करावा. स्वस्तिका घोष ही रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी असून तिन्ही शिक्षणाबरोबरच टेबल टेनिस या स्पर्धेत चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भारताची प्रतिनिधित्व केले होते, ही एक अभिमानाची बाब असल्याचे मानले जाते. सदर बास्केटबॉल स्पर्धेस भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. साधनाताई पवार, अश्विनी भुवड, भाजपच्या पनवेल तालुका सोशल मीडिया संयोजिका मोना अडवाणी, खारघर शहर सोशल मीडिया संयोजिका शोभा मिश्रा, मंजू चोप्रा, निर्मला यादव, सुरेखा जाधव, मैत्रिणी कोळी यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

              खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या बास्केटबॉल स्पर्धेसाठी विशेष योगदान व प्रायोजकत्व देणारे पेस आयआयटी अँड मेडिकल खारघरचे सेंटर हेड डॉक्टर मुकेश सिन्हा, टुडे ग्लोबल डेव्हलपर्सचे भद्रेशभाई शहा, मंगेश आढाव, सत्यम ग्रुपचे विनोद भाई पटेल यांचे मोलाचे योगदान लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल कोच विनय ढिल्लोड, परेश पाटील, अक्षय राणा, अमित थिटे, प्रवीण जाधव यासह आदित्य हातगे, दिनेश यादव, गोपाल राजपूत, कुणाल देवकर, रणजीत पाटील, विराज प्रधान यांनी विशेष मेहनत घेतली. सदर स्पर्धेसाठी अपोलो हॉस्पिटल बेलापूर यांच्या वतीने स्पर्धेदरम्यान खेळाडूंना काही दुखापत अथवा इजा झाल्यास प्रथमोपचारासाठी स्टाफ नर्स तसेच ॲम्बुलन्स सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. बास्केटबॉल स्पर्धेचे संपूर्ण सूत्रसंचालन हे नवीन खरे यांनी केले.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement