चिंचपाडा येथे पनवेल ग्रामीण लॉरी चालक-मालक संघटनेची बैठक संपन्न
प्रभात पर्व न्यूज - Published: 08-May-2023 05:03 pm
पनवेल : आज (सोमवार, दि. ८ मे ) रोजी चिंचपाडा येथील कालभैरव मंदिरात लोकनेते दि. बा. पाटील साहेब २७ गाव संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण लॉरी चालक-मालक संघटनेची बैठक संपन्न झाली. यावेळी तळोजे, पनवेल, नवी मुंबई, खालापूर, खोपोली येथील लॉरी मालक तसेच कुंडेवहाळ येथील क्रशर मालक व स्थानिक भूमिपुत्र उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक क्रेशर मालक, रॉली मालक, बांधकाम व्यावसायिक यांनी मे. स्वराज स्टोन विरोधात रोष व्यक्त करीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.....
१) मे. स्वराज स्टोनविरुद्ध सर्व भूमिपुत्रांची एकजूट करून स्थानिक भूमिपुत्रांच्या क्रशर चालू करून घेण्याबाबत निर्णय झाला.
२) वाढीव भावामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक लॉरी मालकांना न्याय देण्याबाबत चर्चा झाली.
३) पनवेल तहसीलदार यांचे आणि मे. स्वराज स्टोन तसेच भारतीय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (आसाम) यांचे नक्की काय साटे-लोटे आहेत का? हे बघून घेण्यासंदर्भात चर्चा झाली.
४) मे.स्वराज स्टोनमुळे स्थानिक क्रेशर मालक, रॉली मालक बांधकाम व्यावसायिक, स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, फ्लॅट खरेदी करणारे ग्राहक ही सर्व या स्वराज स्टोनच्या जाचक वाढीव भावामुळे त्रस्त होत आहेत. येत्या पंधरा दिवसात सरकारला तीव्र जन आंदोलनाचा इशारा तसेच देण्याचा तसेच मेसर्स स्वराज स्टोन कंपनीला हद्दपार करण्याचे निर्णय घेण्यात आला.