बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैना प्रकल्पग्रस्त समितीने घेतली विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची भेट
प्रभात पर्व न्यूज - Published: 03-May-2023 12:51 pm
मुंबई : सिडकोच्या नैना प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध असून शेतकऱ्यांनी हा प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी विविध आंदोलने केली जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने 'गाव बंद' आंदोलन तसेच त्यानंतर वाहन रॅलीच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. नैनाच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैना नैना प्रकल्पग्रस्त समितीने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी अंबादास दानवे यांनी नैना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी येत्या अधिवेशनातही आवाज उठविण्याचे त्यांनी यावेळी दिले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पनवेलमधील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
