परमशांतीधाम वृद्धाश्रमात सनातन संस्था साताराच्या वतीने खाऊ आणि कपडे वाटप
प्रभात पर्व न्यूज - Published: 26-Apr-2023 07:21 pm
तळोजा : येथील तळोजा येथे असलेल्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर आबानंदगिरी महाराज यांनी स्थापन केलेल्या परमशांतीधाम वृद्धाश्रमात सनातन संस्था साताराच्या वतीने खाऊ आणि कपडे वाटप करण्यात आले. अक्षय्य तृतीयेच्या पावन मुहूर्तावर तेथील ३८ हून अधिक वृद्ध स्त्री आणि पुरुष यांनी कपडे आणि खाऊ वाटप यांचा लाभ घेतला. या वेळी वृद्धांनी कपडे आणि खाऊ मिळाल्याविषयी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
